मनोरंजन

उत्तम स्टारकास्ट असलेला “पिल्लू बॅचलर” येतोय ८ डिसेंबरला

Share now

Puja Samantha, Mumbai

नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार आहेत.

विनोदी अंगानं जाणारी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नावावरून प्रेमकथा असल्याचा अंदाज बाधता येतो, पण तरीही कथा काय असेल यांचं कुतूहल आहे. त्याशिवाय उत्तम कलाकार, दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक, उत्कृष्ट गाणी आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र त्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *